सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने राज्यातील सीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. सीएनजीच्या किंमतींमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात सीएनजीच्या किंमती २ रुपये किलोग्रॅमने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहे. मुंबईत आधी सीएनजीची किंमत ७५ रुपये प्रति किलोग्रॅम होती. त्यानंतर आता यात २ रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर विकले जाणार आहे.
सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे.
टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो.