मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी धक्के दिले. अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले. यावेळी सर्वच पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला होता. त्यामुळे २५० आमदार रिंगणात होते. त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे.
यांचे डिपॉझिट जप्त
- राजकुमार पटेल (मेळघाट)
- देवेंद्र भुयार (मोर्शी)
- गीता जैन (मीरा भायंदर)
- नवाब मलिक (मानखुर्द)
- लक्ष्मण पवार (गेवराई)
- बाळासाहेब आजबे (आष्टी)