विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी (शनिवार, 23) 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. राज्यभरातील कल समोर येत आहे. अतिशय चुरशीने आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीचा महाफैसला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुणे जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मातब्ब नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारी ही निवडणूक असल्याचे मानले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आहे ते जाणून घेऊया
पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!
कोथरूड - चंद्रकांत पाटील आघाडीवर.
पर्वती - माधुरी मिसाळ आघाडीवर
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
खडकवासला - सचिन दोडके आघाडीवर
हडपसर - चेतन तुपे आघाडीवर
वडगाव शेरी - सुनील टिंगरे आघाडीवर
कॅन्टोन्मेंट - रमेश बागवे आघाडीवर
पुरंदर विधानसभा - विजय शिवतारे आघाडीवर
पुणे कसबा पेठ - हेमंत रासने आघाडीवर
आंबेगाव विधानसभा - दिलीप वळसे पाटील आघाडीवर
मावळ मतदारसंघ - सुनील शेळके आघाडीवर
चिंचवड - शंकर जगताप आघाडीवर
शिरूर हवेली - ज्ञानेश्वर कटके आघाडीवर
दौंड - राहुल कुल आघाडीवर
बारामती - अजित पवार आघाडीवर
पिंपरी मतदारसंघ - अण्णा बनसोडे
कोथरूड - चंद्रकांत पाटील