सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत नवीन निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सोमवारी PAN 2.O प्रोजेक्टसाठी मंजुरी दिली आहे. या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने १४३५ रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे
केंद्र सरकारने पॅनकार्डसंबंधी एक नवा आणि मोठा बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1,435 कोटी रुपयांच्या पॅन 2.0 प्रोजेक्टला मान्यता मिळाली आहे. या नव्या प्रोजेक्टनुसार आता नागरिकांचे जुने पॅनकार्ड हे रद्दीत जमा होणार आहे. नागरिकांना आता पॅनकार्ड हे क्यूआर कोडसह अपडेट होऊन मिळणार आहे.
सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर हा ‘कॉमन बिजनेस आइडेंटिफायर’ बनवणं हा या प्रोजेक्टमागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारने म्हटलं आहे. पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत, पॅन कार्ड QR कोडसह विनामूल्य अपग्रेड केलं जाणार आहे.
PAN 2.0 Project नेमका आहे तरी काय?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीने या नव्या प्रोजेक्टला मंजूरी दिली आहे. PAN 2.0 या प्रोजेक्टवर तब्बल 1435 कोटी रुपये खर्च केले जातील.
सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.पॅन 2.0 प्रोजेक्टचा उद्देश हा उत्तम गुणवत्तेसह सुलभ आणि जलद सेवा देणं हा आहे. पॅन 2.0 प्रोजेक्टमुळे केवळ करदात्यांनाच फायदा होणार नाही तर आयकर विभागाच्या कामकाजातही गती आणि पारदर्शकता येणार आहे.
जुन्या पॅनकार्डचं काय होणार?
केंद्र सरकारच्या नव्या प्रोजेक्टनुसार आता नवं बारकोड असलेलं पॅनकार्ड नागरिकांना मिळणार आहे. अशात जुन्या पॅनकार्डचं काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना नवे पॅनकार्ड मिळाले तरी त्याचा नंबर बदलणार नाहीये. अपडेटेड पॅन कार्ड नव्या फिचर्ससह येणार आहे. यामध्ये QR कोड समाविष्ट असेल.तसेच, अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असेल, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. यासोबतच पॅन अपग्रेडेशन विनामूल्य असेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्यामुळे सध्याच्या पॅनकार्डधारकांना काहीही बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.