इस्त्रोच्या महत्वकांक्षी मोहिमेची चाचणी यशस्वी; गगनयान अवकाशात झेपावलं
इस्त्रोच्या महत्वकांक्षी मोहिमेची चाचणी यशस्वी; गगनयान अवकाशात झेपावलं
img
Dipali Ghadwaje

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या महत्वकांक्षी मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. श्रीहरिकोटा येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आलं असून गगनयान 400 किलोमीटरपर्यंत अवकाशात झेपावलं आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे.

इस्त्रोच्या या गगनयानचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज लॉन्चिंग केलं जाणार होतं. यासाठी काउंडाऊन सुद्धा मात्र, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणींमुळे काही मिनिटांसाठी लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं. या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर गगनयानचं उड्डाण करण्यात आलं. 

गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आले आहे. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाणार आहे. 

‘गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. त्यामुळे आता या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. ‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान३४.९  मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.

 
क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे तीन भाग असतील - सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम.


ISRO |
इतर बातम्या
Join Whatsapp Group