भारताच्या मोहिमेकडं जगाचं लक्ष ; आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार....
भारताच्या मोहिमेकडं जगाचं लक्ष ; आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेणार....
img
Dipali Ghadwaje
चांद्रयानाच्या मोठ्या यशानंतर भारत आता सूर्याच्या दिशेने झेप घेत आहे. आजपासून भारताची सूर्याभ्यास मोहीम सुरू होतेय. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे आदित्य एल १ हे यान सकाळी ११.५० वाजता सूर्याकडे झेपावणार आहे. 

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.

आदित्य एल-1 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार
आदित्य एल-1 या मोहिमेबाबत लोकांमध्ये सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.  आदित्य एल 1 हे यान आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 मिनिटांनी प्रक्षेपित केलं जाईल.

दरम्यान हे यान पोलार सॅटेलाईट द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. आदित्य एल 1 या नावावरुनच या मोहिमेचं उद्देश लक्षात येतो. सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलं. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, एल 1 पॉईंट हा पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे. आदित्य एल 1 हे सूर्याच्या एल 1 पॉईंटवरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. 

मिशन आदित्य एल 1 
भारताची ही पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान सप्टेंबरच्या सुरुवातील लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोचं आदित्य एल1 मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे. आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. तिथून हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार असून त्याचा अभ्यास करणार आहे. 

आदित्य एल १ प्रक्षेपण कुठे पाहायचे?

चांद्रयानानंतर आदित्य एल-१ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी जगभरातील नागरिक उस्तूक आहेत. त्यामुळे याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी इस्रोने वेगळी व्यवस्था केली आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथील केंद्रातून प्रक्षेपण दाखवण्याची सोय केलीये. प्रक्षेपण थेट पाहण्यासाठी व्ह्यू गॅलरी सीट्स बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. नोंदणीसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

सूर्याकडे झेप घेण्याचा फायदा काय?

सूर्य हा पृथ्वीपासून जवळचा तारा आहे. ताऱ्यांचा अभ्यास करताना याबाबात माहिती असणे गरजेचं आहे. यामुळे आपल्याला आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील विविध माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. सूर्य १५० दशलक्ष किमी दूर आहे. आदित्य एल १ निश्चित कक्षेपर्यंत पोहचल्यास सूर्याचा आणखीन अभ्यास करता येईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group