मुंबई बोट अपघातप्रकरणी मोठी अपडेट :
मुंबई बोट अपघातप्रकरणी मोठी अपडेट : "ही" धक्कादायक माहिती आली समोर
img
DB
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार , या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बोट अपघातातील 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिली आणि ही बोट बुडाली. या दुर्घटनेत नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८२, ३२४(३)(५) अन्वये तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर नेव्हीच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकल्याचा तो व्हिडीओ काढला, त्याच व्यक्तीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्पीड बोट वरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group