भारतीय नौदलाने उधळला जहाज अपहराणाचा प्रयत्न; नेमकं घडलं काय?
भारतीय नौदलाने उधळला जहाज अपहराणाचा प्रयत्न; नेमकं घडलं काय?
img
DB
अरबी समुद्रातील मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडला आहे. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अरबी समु्द्रात माल्टा देशाचे जहाज MV रुएनचे अपहरण करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समोर येताच भारतीय नौदलाने तातडीने बचाव कार्यासाठी धाव घेतली आहे. भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका आणि समुद्रात गस्त घालणाऱ्या विमानाला रवाना केले आहे. 

भारतीय नौदलाने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. नौदलाने सांगितले की, माल्टाचा ध्वज असलेले १८ चालक दल असणाऱ्या मालवाहू जहाज एमव्ही रुएन वर सहा अज्ञात व्यक्तींनी कब्जा केला होता, परंतु भारतीय नौदलाने हे लक्षात येताच त्वरित कारवाई केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माल्टाचे हे जहाज कोरियाहून तुर्कियेला जात होते. यावेळी सोमालियातील समुद्री चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीय नौदलाची विमाने या जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आता हे जहाज सोमालियाच्या किनाऱ्याकडे सरकत असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी भारतीय नौदलाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अरबी समुद्रात घडलेल्या एका घटनेवर आम्ही तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे माल्टाहून आलेले जहाज होते. या जहाजात 18 जण उपस्थित होते. समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते, असे वृत्त आहेत.  एडनच्या खाडीत गस्तीवर असलेल्या पथकाला माल्टा देशाचे जहाज MV रुएनकडून अपहरण  झाल्याचा संदेश मिळाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर बचाव कार्यासाठी तात्काळ मदत पाठवण्यात आली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group