काँग्रेसच्या 'त्या' पत्रानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार
काँग्रेसच्या 'त्या' पत्रानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार
img
Dipali Ghadwaje
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारक उभारावं, अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात होती.


काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 28 डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली होती. आता मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार आहे. 

काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर केंद्र सरकारकडून मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करून घेतले जावेत. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल.  विश्वस्त मंडळ स्थापन करून मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

दरम्यान, आज शनिवारी सकाळी 8 वाजता मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. तेथे 8.30 ते 9.30 दरम्यान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 वाजता काँग्रेस मुख्यालयातून सुरू होणार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर नवी दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group