महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे  व्हिडीओ बनवून वेबवर विकणाऱ्यास अटक
महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून वेबवर विकणाऱ्यास अटक
img
दैनिक भ्रमर

प्रयागराज (भ्रमर वृत्तसेवा) :-महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून ते डार्क वेबवर कल्याच्या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील शिराळामधून एका तरुणास गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. प्राज पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राज पाटीलसह लातूरमधील प्रज्वल तेली आणि प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंदला देखील अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासात असे दिसून आले आहे की लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली नावाचा आरोपी या प्रकरणात परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता.

रोमानिया आणि अटलांटा येथील हॅकर्ससह आढळले तो मॉल्स हॉस्पिटल प्रयागराजचे व्हिडीओ बनवायचा आणि ते डार्क वेबवर पाठवायचा. लातूरच्या या आरोपीसोबत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश असल्याचे समजते. आरोपी असलेले सर्वजण टेलिग्रामवर वेगवेगळे अकाउंट तयार करून आणि काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व 2 हजार ते 4 हजार रुपयांमध्ये मिळवून या व्हिडिओंसाठी पैसे कमवत असत. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे अर्धनग्न व्हिडिओ परदेशी हॅकर्सनी बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले.

याशिवाय आरोपींनी गुजरात, महाराष्ट्रातील हॉस्पिटल मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले. याशिवाय त्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील हॉस्पिटल मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले. लातूरमधून पैशांच्या व्यवहाराची लिंक सापडली आहे. लातूरमधील आरोपीच्या खात्यात परदेशातून पैसे आल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली आहे. गुजरात आणि प्रयागराजमध्ये 2 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सदर प्रकरणात एकूण 13 एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group