क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! आजपासून YouTube वर होणार
क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! आजपासून YouTube वर होणार
img
Dipali Ghadwaje
YouTube क्रिएटर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने YouTube Shorts वरील व्ह्यूज मोजण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 31 मार्चपासून लागू होणार आहे.

यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या Shorts च्या कार्यक्षमतेचा अधिक स्पष्ट अंदाज मिळेल. या बदलामुळे, Shorts व्ह्यूजची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

YouTube ने जाहीर केले आहे की, आता Shorts वरील व्ह्यूज मोजण्यासाठी ठराविक सेकंदांचा कालावधी न ठेवता, किती वेळा Shorts प्ले किंवा रिप्ले केले गेले यावर आधारित व्ह्यूज मोजले जातील.

याआधी, Shorts वर किती वेळेपासून ते पाहिले गेले, यावर आधारित व्ह्यूज मोजले जात होते. परंतु, या नव्या पद्धतीमुळे Shorts वरील व्ह्यूजची संख्या नक्कीच वाढेल. या अपडेटनंतर, YouTube Shorts वर मोजले जाणारे व्ह्यूज, इंस्टाग्राम रील्स मापदंडांप्रमाणे असतील.

या बदलामुळे, YouTube क्रिएटर्सना त्यांच्या Shorts ची कार्यक्षमता आणि लोकप्रियतेचा अचूक अंदाज घेता येईल. YouTube ने स्पष्ट केले आहे की, YouTube पार्टनर प्रोग्राम किंवा कमाईवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

याचा अर्थ, उत्पन्नावर किंवा कार्यक्रम पात्रतेवर पूर्वीच्या निकषांमध्ये काहीही बदल होणार नाही. यामुळे, क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटवर सुधारणा करण्यासाठी अधिक माहिती मिळेल, आणि ते त्यांच्या Shorts ची लोकप्रियता वाढवू शकतील.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group