धक्कादायक घटना : १७ वर्षीय पत्नीने बियरच्या बाटलीनं 36 वेळा वार करत केली पतीची हत्या ; नेमकं काय प्रकरण?
धक्कादायक घटना : १७ वर्षीय पत्नीने बियरच्या बाटलीनं 36 वेळा वार करत केली पतीची हत्या ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
17 वर्षीय पत्नीकडून प्रियकराची मदत घेत पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोडलेल्या बियरच्या बाटलीनं 36 वेळा वार केरून आरोपी पत्नीने पतीचा काटा काढला. मध्य प्रदेशाच्या बुऱ्हाणपुरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी प्रियकर,पत्नी आणि दोन मित्रांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यताही पोलीस तपासत आहेत.

इंदूर-इच्छापूर महामार्गावरील बुऱ्हाणपुरमधील आयटीआय कॉलेजजवळील झुडपात 13 एप्रिल रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर राहुल कुमार उर्फ ​​राजेंद्र पांडे याचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृतदेह सापडण्याच्या एक दिवसआधी राहुल कुमार त्याच्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेला होता. तसेच यानंतर आरोपी पत्नी देखील बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांनी या अँगलने तपास सुरु केला. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी आणि तिचा प्रियकर युवराज पाटीलने मिळून राहुल कुमारचा काटा काढण्याचे ठरवले होते. हे जोडपे खरेदी केल्यानंतर व एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बाइकवरून घरी परतत होते.

यावेळी अल्पवयीन पत्नीने चप्पल खाली पडल्याचा बहाणा करीत पतीला दुचाकी रोखण्यास सांगितले. त्याने वाहन रोखताच तिचा प्रियकर युवराजच्या दोन मित्रांनी त्याला घेरले. त्यानंतर दोघांनी राहुलला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी फोडलेल्या बियरच्या बाटलीनं 36 वेळा मृत राहुलवर वार करण्यात आले. आरोपी पत्नीनेही राहुलवर हल्ला केला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच हत्येनंतर प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पतीचा मृतदेह दाखवला आणि'काम हो गया'म्हणून सांगितलं.

पतीला खरेदीच्या बहाण्यानं घराबाहेर नेऊन निर्मनुष्य ठिकाणी हत्या केली. यानंतर चारही आरोपी ट्रेनने इंदूरला पळून गेले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन डेटा वापरून आरोपींचा माग काढला आणि त्यांना इंदूरमधील सनवेर येथून अटक केली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group