मोठी बातमी!
मोठी बातमी! "त्या" हत्याकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेप
img
Dipali Ghadwaje
आत्ताच  एक मोठी बातमी समोर आली आहे . सहाय्यक पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज लागला.

या प्रकरणातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच त्याला २० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

त्याचसोबत या प्रकरणातील इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती.

अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group