माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातला कुकर ; धक्कादायक कारण आले समोर
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातला कुकर ; धक्कादायक कारण आले समोर
img
Dipali Ghadwaje
एकीकडे जग मातृदिन साजरा करत असतानाच सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यात  माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे . पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुकर घालून जीवघेणा हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे या निर्दयी मुलाच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विजयालक्ष्मी सिंचणसुरे असे जखमी आईचे नाव आहे. आरोपी मुलगा हा आईचा सांभाळ करत होता. मात्र आईचा सांभाळ करत असतानाही ती पेन्शनचे पैसे इतर मुलांवर खर्च करते या रागातून पोटच्या मुलानेच हे भयानक कृत्य केले आहे.  

आरोपी मुलगा हा शिक्षण विभागात लिपिक पदावर कार्यरत असून उच्चशिक्षित आहे. मात्र पोटच्या मुलानेच 65 वर्षांच्या आईवर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आई वडिलांच्या पेन्शनचे पैसे इतर मुलांवर खर्च करते याचा राग धरून या मुलाने कुकर आपल्या आईच्या डोक्यात घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे.  अमित सुरेश धुपद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हल्ला करणारा मुलगा हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला. आता त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा क्रूर घटनेने सोलापूर जिल्ह्या हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group