मे महिना सुरु होणार आहे. मे महिन्यात अनेक सण असल्याने त्यासाठी तब्बल ७ दिवस बँका बंद असणार आहे. यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहे. त्यामुळे राज्यानुसार सुट्टी असणार आहे. दुसरा आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असणार आहेत. त्यामुळे मे महिन्यात बँकेच्या संबंधित काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी वाचून जा.
मे महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी :
१ मे २०२५, गुरुवार मे महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. मे दिवस यानिमित्त गोवा, आसाम, मणिपुर, केरल, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर, बिहार, गुजरात, कर्नाटक,तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणामध्ये बँका बंद असणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रात बँका बंद असणार आहेत.
४ मे २०२५, रविवार रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
८ मे २०२५ गुरु रविंद्र जयंतीनिमित्त दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि त्रिपुरा येथील बँका बंद असणार आहे.
१० मे २०२५ दुसऱ्या शनिवारी बँका बंद असणार आहे.
११ मे २०२५, रविवार रविवारनिमित्त संपूर्ण देशात बँका बंद असणार आहेत.
१२ मे २०२५ सोमवार बुद्ध पोर्णिमानिमित्त उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, सिक्किम, महाराष्ट्र येथे बँका बंद असणार आहे.
१६ मे, शुक्रवार सिक्किम राज्य दिवसानिमित्त सिक्किममध्ये बँका बंद असणार आहे.
१८ मे २०२५, रविवार वीकेंड असल्याने बँका बंद असणार आहे.
२४ मे २०२५ चौथ्या शनिवारी देशातील बँका बंद असणार आहे.