मोठी बातमी : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य ;
मोठी बातमी : पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य ; "या" ठिकाणी मच्छिमारांवर जीवघेणा हल्ला
img
Dipali Ghadwaje
पहलगामनंतर पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी हल्ला केला आहे.

अक्कराईपेट्टईच्या सेरुधर गावातील ३० मच्छिमार शुक्रवारी बोटीने कोडियाकरईच्या दक्षिण-पूर्व भागात मासेमारी करण्यास जात होते. श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात १७ मच्छिमार जखमी झाले आहेत. या मच्छिमारांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

सेरुधूर गावातील ३० मच्छिमार एका बोटीने कोडियाकरईच्या दक्षिण-पूर्व भागात मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या वेगात समुद्री चाच्यांची बोट समोर आली. या बोटीत ६ लोक होते. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. या चाच्यांनी मच्छिमारांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात १७ मच्छिमार जखमी झाले. जखमी झालेल्या मच्छिमारांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

श्रीलंकेच्या चाच्यांनी हल्ला केल्यानंतर मच्छिमारांना लुटण्यास सुरुवात केली. या चाच्यांनी मच्छिमारांकडून जीपीएस डिव्हाइस, मासे पकडण्याचे जाळे आणि अन्य वस्तू चोरल्या.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , मच्छिमारांच्या माहितीनुसार, चाच्यांनी एकूण १० लाखांचं नुकसान केलं. मच्छिमारांचा दावा आहे की, 'चाच्यांनी केलेला हल्ला हा भारताच्या समुद्री सीमेच्या आत केलाय. चाच्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान मच्छिमारांनी हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवसांचा संप ठेवला आहे. तसेच  समुद्रात हल्ले होत राहिले तर मच्छिमार अनिश्चिच काळासाठी संप करतील, असा इशारा मच्छिमारांनी  दिला आहे.    
इतर बातम्या
Join Whatsapp Group