भारतातील लाखो विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतात, जी बहुतेकदा देशातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते 18-19 वर्षे म्हणजे कॉलेजमध्ये मज्जा मस्ती करण्याचं वय. पण याच वयात कोणी सीए झालं तर? अनेकजणांची सीए बनताना वयाची तिशी ओलांडते. पण नंदिनी यांनी वयाच्या 19 व्या वर्षी हा कारनामा केलाय.
नंदीनी ही मध्य प्रदेश येथील मुरैनाची रहिवाशी आहे. तिने 19 वर्षाची असताना जगातील सर्वात तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट बनली. यासोबतच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
नंदिनी अग्रवाल लहानपणापासून मेहनती विद्यार्थिनी आहे. त्यामुळे तिला शाळेचे दोन वर्ग वगळण्याची संधी मिळाली. नंदिनीने वयाच्या 13 व्या वर्षी 10वी बोर्डाची परीक्षा दिली. तर वयाच्या 15 व्या वर्षी 12वी बोर्डाची परीक्षा पूर्ण केली. आपले समवयस्क जे शिक्षण घेतायत त्यापेक्षा जास्तीचे शिक्षण घेण्यात नंदीनीला पहिल्यापासून रस होता. त्यामुळे ती नेहमी एक पाऊल पुढचा विचार करायची. या गोष्टीचा आयुष्यात तिला फायदा झाला.
इतर मुलांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा ती नेहमी व्यक्त करत असे. यानंतर तिने सर्वात कमी वयात सीए होण्याचे लक्ष्य ठेवले.2021 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी नंदिनी अग्रवालने सीएची फायनल दिली. यात 800 पैकी 614 गुण म्हणजेच 76.75% मिळाले. तिने ऑल इंडिया रँक 1 मिळवला होता.
सीएचा निकाल जाहीर झाला तेव्हा नंदिनी 19 वर्षे आणि 330 दिवसांची होती.जगातील सर्वात तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा बहुमान तिने मिळवला होता. मोठ्या भावाचा माझ्या प्रवासात महत्त्वाचा वाटा असल्याचे नंदिनी सांगते.
भाऊदेखील सीए परीक्षेची तयारी करत असल्याने त्याच्यासमोरील आव्हाने मी समजून घेतली. त्याने मला मार्गदर्शन केले, असे ती सांगते.नंदिनीने अंतिम गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला, तर तिच्या भावाने त्याच परीक्षेत 18 वा क्रमांक मिळविला.