'मुरांबा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
'मुरांबा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! "या" प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री?
img
Dipali Ghadwaje
स्टार प्रवाहच्या 'मुरांबा' मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर इरावती हे पात्र साकारणार आहे. 
 
इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवतेय. डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय आणि त्याच मनसुब्याने ती मुकादमांच्या घरी आलीय. 
 
इरावतीचा प्लॅन यशस्वी होणार का? तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळ उठणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. या मालिकेतल्या भूमिकेविषयी अदिती सारंगधरने प्रतिक्रिया दिली आहे. 
 
"मुरांबा मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. हजारचा टप्पा गाठल्यानंतर अतिशय उत्कंठावर्धक वळणावर मला एका चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अशा पद्धतीची भूमिका मी याआधी केलेली नाही," असं ती म्हणाली.

 भूमिकेविषयी तिने पुढे सांगितलं, "मी पहिल्यांदा मेडिटेशन हीलरच्या रुपात दिसणार आहे. एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना खूप आनंद होतोय."
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group