‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. यापूर्वी या विमानतळांवरील उड्डाणे 15 मे 2025 पर्यंत रद्द करण्यात आली होती. आज फक्त ३१ विमानतळे उघडली जात आहेत, तर श्रीनगरला जाणारी सेवा उद्यापासून सुरू होईल.
बंद करण्यात आलेल्या 32 विमानतळांपैकी 31 विमानतळं आजपासून पुन्हा सुरू केली जाणार असून, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे उद्यापासून (दि.13) सुरू केली जाणार आहे.
यानिर्णयानंतर आता अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपुर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवाडा, हिंडन जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट , पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, थोइस, उत्तरलाई या 31 विमानतळांवरील सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तामधील वाढता तणाव आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एकूण 32 विमानतळांवरील उड्डाणे सुरूवातीला १० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर यात बदल करत याची डेडलाईन १५ मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती. या बंदमुळे अनेक प्रवाशांसह विमानकंपन्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होता.