भारतीय सुरक्षा दलात BSF आता एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. BSF सैनिकांच्या गणवेशात बदल करण्यात येणार असून आता जवानांना नवीन पोशाख मिळणार आहे.
त्यामुळे आता लवकरच BSF चे जवान डिजीटल पॅटर्नसह नवीन गणवेशात दिसणार आहेत. बीएसएफमधील जवानांचा गणवेश बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील एका वर्षात संपूर्ण दल नवीन पोशाखात आपल्याला बघायला मिळेल.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाने या नव्या बदलात विशेष लक्ष दिले आहे. सैनिकांच्या गणवेशातील रंगांच्या गुणोत्तरामध्ये ५०% खाकी, ४५% हिरवा आणि ५% तपकिरी रंगाचा वापर करण्यात आला आहे.
बीएसएफच्या परवानगीशिवाय कोणीही या डिझाइनची कॉपी करू शकत नाही, घालू शकत नाही किंवा शिवून घेऊ शकत नाही. जर कोणी असे केले तर ते बेकायदेशीर असून त्या व्यक्तीवर कारवाई करत थेट तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.