मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमारेषेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यांनतर त्यांने स्वत:वर गोळी मारत आत्महत्या केली. गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार , या गोळीबाराचा संबध सध्या मणिपूरात सुरु असलेल्या जातीय दंगलीशी नसल्याचे आसाम रायफल्स कडून सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी भारत म्यानमार सीमारेषेजवळ आसाम रायफल्स बटालीयनमध्ये ही घटना घडली आहे.
सर्व जखमी जवानांना चुराचंदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण मणिपरमधील एआर बटालियन कॅम्पसमध्ये ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही, अशी माहिती देखील समोर येत आहे.