भल्या पहाटे हादरली जमीन! परिसरात भीतीचे वातावरण
भल्या पहाटे हादरली जमीन! परिसरात भीतीचे वातावरण
img
Dipali Ghadwaje
हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली येथे पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. दरम्यान या भूकंपात कुठलीही जीवित किंवा वित्तहाणी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाहीये.
 
याबद्दल अधिक महिती अशी की, हा भूकंप आज ​​(सोमवार) पहाटे ५:०९ वाजता झाला. भूकंपानंतर लोक प्रचंड घाबरले आणि घराबाहेर पडले. महाराष्ट्रातील हिंगोलीपूर्वी 19 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी महासागमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.36 वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजली गेली. रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधी८ल दोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये रविवारी दुपारी 3.45 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि रविवारी सकाळी 11.30 वाजता जम्मू-काश्मीरच्या दोडा येथे 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group