दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये रविवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी पेरूच्या मध्य किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे लिमा आणि बंदर शहर कॅलाओ हादरले.
पेरूमध्ये भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तर पेरूची राजधानी लिमामध्ये भूकंपानंतर भूस्खलनही झाले. पेरूसह पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये सलग दोन दिवस भूकंप झाले.
मिळालेल्या माहितीनुसार , पेरूमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. राजधानी लिमा आणि त्याच्या आसपास भूस्खलन झाले आणि धूळ आणि वाळूचे मोठे मोठे लोट उठले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्रीय केंद्राने सांगितले की, रविवारी दुपारच्या काही वेळापूर्वी भूकंप झाला, त्याचे केंद्रबिंदू लिमाला लागून असलेल्या कॅलाओ या बंदर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते. लिमामध्ये एका व्यक्तीच्या कारवर भिंत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने लिमामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.