अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान काल कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. यातील फक्त १ प्रवासी जिवंत वाचला. सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचसोबत हे विमान ज्या इमारतीवर पडले ती इमारत शासकीय रुग्णालयाचे हॉस्टेल होते. या इमारतीमधीलही काही मुलांचे निधन झाले आहे.
दरम्यान अहमदाबाद विमान अपघातानंतर जगभरात दुःख व्यक्त केले जात आहे. अहमदाबादमधील या दुर्दैवी घटनेत २६५ जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये कोणी आपला लेक, बहीण, मुलगा, वडील गमावले आहेत.
दरम्यान, या अपघातात बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषच्याही जवळच्या व्यक्तीने निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पायल घोषने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
"तिने लिहलंय की, RIP प्रिती, माझ्या भावना चॅटर्जी कुटुंबासोबत आहेत. #AhmedabadPlaneCrash असं लिहलं आहे. प्रिती चॅटर्जी ही पायल घोषची जवळची मैत्रिण होती. मैत्रिणीच्या अचानक जाण्याने अभिनेत्रीलाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी सावरण्यासाठी बळ मिळो, असं पायलने म्हटलं आहे."
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर शाहरुख खाननेही सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. अहमदाबादमधील अपघाताबाबत ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबासाठी माझी प्रार्थना. याचसोबत आमिर खान, करिना कपूर, आलिया भट्ट,सनी देओल, दिशा पाटनी यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.