आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. भाजी घेण्यापासून ते कोणाला पैसे पाठवायचे असतील तर आपण ऑनलाइन पद्धतीने पाठवतो.यूपीआय पेमेंटद्वारे सर्वकाही सोपे झाले आहे. भारतात सर्वाधिक लोक यूपीआयचा वापर करतात. अशातच आता यूपीआयच्या नियमांत मोठा बदल झाला आहे. यामुळे रोज पेमेंट करणे आणखी सोपे होणार आहे.
यूपीआयच्या या नवीन नियमांमुळे अवघ्या काही सेकंदातच तुम्ही पैसे पाठवू शकणार आहात.
यामुळे पेसै पाठवण्याची प्रोसेस खूप जलद होणार आहे. १६ जुलै २०२५ पासून यूपीआयद्वारे पेमेंट करण्याच्या रिस्पॉन्स टाइम कमी करण्यात आला आहे. याचसोबत बॅलेन्स चेक करणे ते ऑटो पेमेंटच्या अनेक गोष्टी अपग्रेड केल्या आहे. यामुळे यूपीआय पेमेंट करणे आणखी सोपे होणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २६ एप्रिल रोजी सांगितले होते की, ते पर्फॉर्मन्स चांगला करण्यासाठी आणि यूपीआयचा रिस्पॉन्स टाइम कमी करण्यासाठी काम करत आहे. त्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. आता रिस्पॉन्स टाइम अर्ध्यापेक्षा कमी केला आहे.
आता तुम्ही फक्त १० सेकंदात यूपीआय पेमेंट करु शकणार आहात. याआधी तुम्हाला ३० सेकंद वाट पाहावी लागयची. आता हा वेळ १५ ते १० सेकंद झाला आहे.
नवीन नियमांसाठी सिस्टीममध्ये करावे लागणार बदल
एनपीसीआयने सांगितले की, यूपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अजून चांगल्या अनुभवासाठी सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागणार आहे. यासाठी क्विक रिस्पॉन्स मॅनेजमेंटमध्ये जाऊन काही बदल करा. त्यानंतर तुम्ही फक्त १० सेकंदातच पेमेंट करु शकणार आहात.