महत्वाची बातमी : १ एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवरील UPI होणार बंद ;
महत्वाची बातमी : १ एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवरील UPI होणार बंद ; "हे" आहे कारण?
img
Dipali Ghadwaje
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे निर्देश 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यानंतर बँका आणि UPI अ‍ॅप्स इनअ‍ॅक्टिव्ह असलेले असे मोबाइल नंबर काढून टाकण्यास सुरुवात करतील.

याचा परिणाम असा होणार आहे की, जे मोबाइल नंबर काढून टाकले जातील ते लोक ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाहीत. फोनपे, गुगल पे, पेटीएम आदी यूपीआय अ‍ॅप्सचा वापर त्यांना करता येणार नाही आणि डिजिटल बँकिंग सेवा मिळणेही त्यांना अवघड जाणार आहे.

जे मोबाइल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह असतील, तेच काढून टाकण्यात येणार आहेत. इनअ‍ॅक्टिव्ह मोबाइल क्रमांक म्हणजे काय, याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. आपला मोबाईल नंबर इनअ‍ॅक्टिव्ह आहे की नाही, ते कसे शोधायचे, असा सवालही लोक विचारत आहेत.

NPCI ने बँका आणि UPI अ‍ॅप्सना इनअ‍ॅक्टिव्ह क्रमांक काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.  31 मार्चपर्यंत सर्व इनअ‍ॅक्टिव्ह क्रमांक काढून टाकावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पेमेंट फेल्युअर होण्याच्या समस्येपासून आणि फसवणुकीच्या जोखमीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी इनअ‍ॅक्टिव्ह मोबाइल नंबर काढून टाकले जात आहेत.

इनअ‍ॅक्टिव्ह मोबाइल क्रमांक म्हणजे काय?

जेव्हा जेव्हा आपल्या प्रीपेड मोबाइल सिमची वैधता संपते तेव्हा आपण ते रिचार्ज करतो आणि नंबर पुन्हा काम करू लागतो. पण जर एखादा मोबाइल नंबर 90 दिवस रिचार्ज केला नाही तर त्याच्या कॉल्स, SMS आणि डेटाची वैधता पूर्णपणे संपते. यानंतर हा नंबर निष्क्रिय होतो. म्हणजेच मोबाईल नंबर ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीकडून दुसऱ्या कुणाला दिला जाऊ शकतो. समजा तुम्ही 90 दिवस फोन रिचार्ज केला नाही आणि काही दिवस वाट पाहिल्यानंतर तुमचे ऑपरेटर जिओ, एअरटेल आणि Vi यांनी तो नंबर दुसऱ्या कुणाला दिला, तर तुमचे सिम निरुपयोगी ठरते आणि नवीन युजर तो नंबर वापरू लागतो.

इनअ‍ॅक्टिव्ह मोबाईल नंबर कसा ओळखावा?

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर 90 दिवसांपासून रिचार्ज केला नसेल तर तो UPI अ‍ॅप किंवा तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असेल तर लगेच रिचार्ज करा. तुमचा नंबर इनअ‍ॅक्टिव्ह झाला आहे की नाही या द्विधा मनस्थितीत असाल तर जवळच्या जिओ, एअरटेल किंवा Vi ग्राहक केंद्रावर जाऊन ते जाणून घ्या, त्यांना संपूर्ण माहिती द्या. तो नंबर अ‍ॅक्टिव्हेट करता येईल की नाही हे सांगेल.

UPI पेमेंट असो किंवा बँकिंग सेवांचा वापर, हल्ली मोबाइल नंबर केवळ ओळख म्हणून काम करतो आणि त्या व्यक्तीला योग्य पेमेंट मिळत आहे की नाही, याची खात्री करतो. मोबाइल नंबर वापरात नसेल आणि दुसरा कोणी जारी केला तर तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. पेमेंट फेल्युअरची व्याप्ती वाढते. त्यामुळेच NPCI ला असे नंबर डिलीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

NPCI च्या निर्देशानंतर UPI अ‍ॅप्सची माहिती आणि बँका काढत असलेले नंबर 1 एप्रिलनंतर समोर येतील. इनअ‍ॅक्टिव्हमुळे कोणते मोबाइल क्रमांक काढून टाकले जातील हे सांगण्यासाठी दर आठवड्याला अपडेट जारी केले जाईल. NPCI च्या संकेतस्थळावर ही माहिती येणे अपेक्षित आहे.  
NPCI | UPI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group