श्रावण महिना हा भक्तिभाव आणि पुण्याच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित असतो. या काळात उपवास, जप आणि दानाचं विशेष महत्त्व असतं. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार हा सर्वात शुभ मानला जातो. आर्थिक समस्या, आरोग्याच्या अडचणी, वैवाहिक विलंब, अशा अनेक अडथळ्यांपासून सुटका होण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो.
या वर्षी श्रावणी सोमवारला शुभ योग
या वर्षी पहिल्या श्रावणातील सोमवारला संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीची पूजा करण्याचा शुभ दिवस आहे. शिव आणि गणेशाची एकत्र उपासना केल्यास सर्व अडथळे दूर होतात. याच दिवशी ‘शिव वास’, ‘आयुष्मान’ आणि ‘सौभाग्य’ योग तयार होतात. जे दीर्घायुष्य, आरोग्य आणि सौख्य देणारे मानले जातात.
लग्नात अडथळा येत असल्यास उपाय
लग्न होण्यामध्ये अडथळा येत असल्यास किंवा वेळ लागत असल्यास, केशर मिसळलेलं जल शिवलिंगावर अर्पण करा. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करत रुद्राभिषेक करा. हे उपाय विवाह विषयक त्रास दूर करण्यास मदत करतात.