महत्त्वाचे ! तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल
महत्त्वाचे ! तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : सोमवार दि. 11 रोजी तिसरा श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्‍वरला जाणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता सीबीएस परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली. 

तिसर्‍या सोमवारी ठक्कर बस स्टॅण्ड येथून त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रविवार दि. 10 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते सोमवार दि.11 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत मेळा बस स्टॅण्ड ते मनसे कार्यालय हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन खांडवी यांनी केले आहे.

प्रवेश बंद असलेला मार्ग
तालुका पोलीस ठाणे, मेळा बस स्टॅण्डपासून ते मनसे कार्यालय ठक्कर बझारपर्यंत येणार्‍या व जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग
तालुका पोलीस ठाणे ते ठक्कर बझारकडे जाणारी वाहने सी. बी. एस. सिग्नल-मोडक सिग्नल-इतरत्र जातील. ठक्कर बझार मनसे कार्यालयाकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक मोडक सिग्नलमार्गे येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group