नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील दोन किलो चांदीचे व तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना ध्रुवनगर येथे घडली.
फिर्यादी पुष्कर विश्वंभर चौधरी (रा. आशा बंगलो, ध्रुवनगर, शिवाजीनगर) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने घरात असलेली 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड, 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 2 किलो वजनाच्या चांदीच्या तोरड्या, लक्ष्मीची मूर्ती व इतर दागिने, दोन तोळ्यांचे 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचा सोन्याचा मनटिका, चार हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या असा एकूण 3 लाख 64 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.मीडियावर पोस्ट केली आहे