नाशिक : घरात घुसून महिलेवर जबरीने बलात्कार, आरोपीस अटक
नाशिक : घरात घुसून महिलेवर जबरीने बलात्कार, आरोपीस अटक
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिला घरात एकटी असल्याची संधी साधून बळजबरीने घरात घुसून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करून मारहाण करणार्‍या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही पांडवनगरी परिसरात राहते. ही महिला दि. 16 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घरात होती. त्यावेळी आरोपी नितीन काळे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हा बळजबरीने पीडितेच्या घरात घुसला. त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच पीडितेला मारहाण व शिवीगाळ केली.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नितीन काळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.


संदीप गुळवे यांची २७ लाखांची कार अज्ञाताने लांबवले 

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्या घराबाहेरील कार अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना जुना गंगापूर नाका परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी दि. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता जुना गंगापूर नाक्यावरील कोंडाई बंगला या त्यांच्या राहत्या ठिकाणी एमएच 15 केसी 6195 या क्रमांकाची 27 लाख रुपये किमतीची टाटा हॅरियर कार पार्क केली होती. दि. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या प्रकरणी गुळवे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. 
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group