स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्याय. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. पक्ष वाढीसाठी पक्षांकडून चांगलाच जोर लावला जात आहे. अशातच पक्षतरांना वेग आला असून बडे बडे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. दरम्यान नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरातच फूट पडली आहे. वाजे यांच्या सख्ख्या काकांनेच पक्षाची साथ सोडत भाजपची साथ दिली आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका आणि सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार हेमंत वाजे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हेमंत वाजे यांनी यापूर्वी सिन्नर नगराध्यक्ष आणि गटनेता अशी महत्वाची पदे भूषवली आहेत.