मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, रिपोर्टमध्ये काय ?
मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, रिपोर्टमध्ये काय ?
img
वैष्णवी सांगळे
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली . आत्महत्या पूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता. यामध्ये तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. 


या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. रुग्णालायाकडून संबंधित मृत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. यामध्ये मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नसल्याचे समोर आले आहे. 

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय? 
१) मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत
२) मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे उघड

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने यांच्यासोबत मृत डॉक्टरचे कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत्यूच्या आधी देखील गोपाल बदनेसोबत कॉल झाल्याचे तपासात समोर आले. गोपाल बदने केवळ मैत्री शिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती आहे. हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेस्निक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group