कित्येक पुरांचा साक्षीदार 'रामसेतू' , रामसेतू पाडून नवीन पूल बांधण्याचे निर्देश
कित्येक पुरांचा साक्षीदार 'रामसेतू' , रामसेतू पाडून नवीन पूल बांधण्याचे निर्देश
img
दैनिक भ्रमर
नाशिकमध्ये शनिवार सायंकाळपासून सुरु झालेल्या आणि रविवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पुर आला. या पुरामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांचे नुकसान झालेच पण सर्वाधिक नुकसान नाशिक आणि पंचवटी यांना जोडणाऱ्या सुमारे ७० वर्षे जुन्या रामसेतू पुलाचे झाले आहे. 
पुरामुळे आधीच कमकुवत झालेल्या रामसेतूची अवस्था आता आणखीनच वाईट झाली आहे. 

गोदावरीला आलेल्या कित्येक पुरांचा रामसेतू हा साक्षीदार राहिला आहे. रामसेतूची निर्मिती १९५५ मध्ये झाली. तेव्हांपासून रामसेतूने काही महापुरांचे आणि अनेक पुरांचे आव्हान लिलया परतवून लावले. त्यात १९६९ आणि २००८ मध्ये आलेल्या महापुरांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी रामसेतू पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. २०१६, २०२२ आणि आता पुन्हा पुरामुळे पूल पाण्याखाली जाऊन कमकुवत झाला आहे. पूल ठिकठिकाणी उखडला गेल्याने आणि काही ठिकाणचे कठडेही गायब झाल्याने पूल रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. एकंदरीतच रामसेतू पूल आज मात्र शेवटच्या घटक मोजतांना दिसत आहे.

त्या पार्श्वभूमीवर आगामी कुंभमेळावेळी येणाऱ्या भाविकांचा भार हा कमकुवत पूल पेलू शकणार नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच रामसेतू पुलासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एक वेगळी घोषणा केली आहे. रामसेतूची स्थिती पाहून मंत्री महाजन यांनी तातडीने रामसेतू पाडून नवीन पूल बांधण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच रामसेतू आता पादचाऱ्यांसाठीही बंद करण्याची सूचना केली. नाशिककरांना आता नवीन रामसेतू आहे त्याच ठिकाणी बांधला जाणार की दुसऱ्या ठिकाणी याची उत्सुकता आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group