नाशिक : कळवण तालुक्यातील बेज, कुंडाणे येथील प्रगतशील शेतकरी गं.भा. रुक्मिणी शंकरराव देवरे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाळासाहेब शंकरराव देवरे, यशवंत शंकरराव देवरे आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेचे कळवण व सुरगाणा तालुका संचालक रवींद्र (बाबा) शंकरराव देवरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता कळवण संगमावर होणार आहे.