नाशिक : पंचवटी व सातपूर येथून दोन मुलींचे अपहरण
नाशिक : पंचवटी व सातपूर येथून दोन मुलींचे अपहरण
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : पालकांनो थोडे सावध व्हा कारण नाशिकमध्ये घडलेल्या अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील पंचवटी व सातपूर परिसरातून दोन मुलींना अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

अपहरणाचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. फिर्यादी हे पंचवटी परिसरात राहतात. दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी घराबाहेर गेली होती. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी आली नाही, म्हणून तिच्या पालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

नांदगाव : पिनाकेश्वर घाटात पुन्हा अपघात : ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली, २ ठार तर १३ भाविक जखमी

अपहरणाचा दुसरा प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी हे शिवाजीनगर परिसरात राहतात. रविवारी (दि. 17) त्यांची मुलगी घरी एकटी होती. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group