नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी ) : राजवाडा देवळाली गाव येथून देवी चौक येथे कामानिमित्त आलेल्या महिलेच्या पर्समधून लांबवलेला सोन्याचा नेकलेस चोरी झाल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात चोरट्या सह सोन्याचा नेकलेस हस्तगत केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजवाडा देवळाली गाव येथील रिजवान इरफान शेख या सोन्याचा नेकलेस दुरुस्तीसाठी देवी चौक या ठिकाणी येत असताना रस्त्यातच अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून एक तोळा एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हातोहात लांबवला. नाशिक रोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना चोरट्याबाबत त्याच्या वर्णनावरून तो जेल रोड भागात नेकलेस विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार,गुन्हे शोध पथकातील महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे, संध्या कांबळे, सुप्रिया विघे यांनी तात्काळ जेलरोड भागात सापळा रचून संशयित चोरटा अक्षय मोतीराम शेजवळ राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी जेलरोड यास 11 ग्रॅम सोन्याच्या नेकलेस सह ताब्यात घेतले.
अवघ्या काही तासात नाशिक रोड पोलिसांनी केलेल्या गुन्ह्या उघडकीस मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. नाशिक रोड पोलिसांनी यापूर्वी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा उलगडा करीत लाखो रुपयांचा मुद्देमालासह संशयितांना पोलीस कोठडीत रावांना केले आहे त्यांच्या कार्यतत्परता आणि कौशल्यामुळे पुन्हा एक गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आला.