उद्या लासलगाव बंदची हाक;
उद्या लासलगाव बंदची हाक;
img
वैष्णवी सांगळे
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून झालेल्या हल्ल्यात कुंदन नरेश पावरीय (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

प्रेमप्रकरणाच्या वादातून लासलगावी युवकाची हत्या

या घटनेनंतर मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस उपअधीक्षक वसंत भोये आणि रेल्वेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

'आम्हीच इथले भाई' म्हणत निलेश घायवळ टोळीकडून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार

दरम्यान, मयतच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. उद्या शुक्रवार दि. १९ रोजी या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना देण्यात आले. उर्वरित आरोपींना तातडीने अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group