नाशिक - जिल्ह्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणा मधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील जवळपास सर्व नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे
नाशिक जिल्ह्यामध्ये रविवारी दुपारी आणि सोमवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांमधून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून मंगळवारी देण्यात आली त्या माहितीनुसार दारणा धरणातून 2हजार 204 , वालदेवी मधून 4018, गंगापूर मधून 6356, आळंदी मधून 243 ,भाहुली मधून 290 ,भाम 510 ,वाघाड 544 ,पालखेड 433 ,नांदूर मधमेश्वर 9465 ,करंजवण 840, पुनेगाव 1950, तासगाव 133, पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात येत आहे त्यामुळे या सर्वच नदीपात्रांना पुन्हा एकदा पुराचे स्वरूप आले असून आजूबाजूच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे