नाशिक : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांची आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांची आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आर्टिलरी सेंटरच्या क्वार्टरमध्ये घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आसाराणी नक्का (वय 24, रा. आर्टिलरी सेंटर क्वार्टर, नाशिकरोड) यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना त्यांचे पती संतोषकुमार यांना समजताच त्यांनी तिला उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजवळ करीत आहेत.

नाशिक : घरफोडीत १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास

आत्महत्येची दुसरी घटना सिडकोतून समोर आली आहे.  फॅनला वायरच्या सहाय्याने गळफास घेत 55 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील विजयनगर परिसरात घडली. मनसुप दिलीप कंकाळ (वय 55) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कंकाळ यांनी घराच्या हॉलमध्ये असलेल्या फॅनला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आवारे करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group