दैनिक भ्रमर ( नाशिक प्रतिनिधी ) -आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बाहेर रोजंदारी शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच चिघळे असून सरकारची प्रतिमात्मक तिरडी काढून आंदोलन केले यावेळी आंदोलन करते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट देखील झाली.
मागील महिन्याच्या नऊ जून पासून नाशिक शहरातील गडकरी चौकात असलेल्या राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बाहेर कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला आत्तापर्यंत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ, तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार शोभाताई बच्छाव, डॉक्टर डि. एस. कराड , रिपाई नेते प्रकाश लोंढे यांच्यासह अनेक नेते आणि राजकीय अधिकाऱ्यांनी भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु शासन स्तरावर ती निर्णय होत नसल्यामुळे यातून मार्ग निघाला नाही.
काही दिवसापूर्वी हे आंदोलनकर्ते संतप्त झाले होते आणि त्यांनी थेट आदिवासी विकास आयुक्तालयात घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये या आंदोलकांच्या विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत.
आंदोलकांचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी संयम सुटला आणि या कार्यकर्त्यांनी शासनाची तिरडी काढली या तिरडीला आंदोलन स्थळी आणून सरकार आणि आदिवासी विकास आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.हि तिरडी आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी त्याला विरोध केला त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करते यांच्यामध्ये झटपट झाली पण पोलिसांनी ही तिरडी जप्त केली त्यामुळे हे आंदोलन करते अजूनच संतप्त झालेले आहेत. येणारा काळामध्ये हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.