कन्नड अभिनेता दर्शनला सुप्रीम कोर्टाचा दणका, ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’ म्हणत हत्याप्रकरणी जामीन नाकारला
कन्नड अभिनेता दर्शनला सुप्रीम कोर्टाचा दणका, ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’ म्हणत हत्याप्रकरणी जामीन नाकारला
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : सर्वोच्च न्यायालयाने कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याचा जामीन गुरूवारी रद्द करत त्याला मोठा धक्का दिला आहे. दर्शन याला त्याचा फॅन रेणुकास्वामी याच्या हत्या प्रकरणात शिक्षा झाली होती.अभिनेता दर्शनला मिळालेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने आता रद्द केला आहे. त्यामुळे आता लवकरच पोलीस अभिनेत्याला अटक करतील. काल, कर्नाटक सरकारच्या जामीन रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

राज ठाकरेंकडून युतीचे स्पष्ट संकेत; मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

नेमके प्रकरण काय ? 
 दर्शनवर २०२४ मध्ये हत्येचा आरोप करण्यात आला होता. दर्शन थुगुदीपा याला त्याचा 33 वर्षीय चाहता एस. रेणुकास्वामी याचं अपहरण करणं, त्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  त्याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यासह आणखी 17 जणांचा यात समावेश होता. रेणुकास्वामीनं दर्शनची मैत्रीण, अभिनेत्री पवित्रा गौडा हिला कथितपणे अश्लील मेसेज पाठवले होते. या प्रकरणात अनेक पुरावेही पोलिसांनी गोळा केले होते. या प्रकरणात अनेकदा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला होता. असं असताना कर्नाटक हायकोर्टानं दर्शनला जामीन मंजूर केला होता.

मात्र आज अभिनेता दर्शनला मोठा धक्का देता ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group