नाशिकमध्ये मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
नाशिकमध्ये मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
img
वैष्णवी सांगळे
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच  राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे.

नाशिकमध्येही मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती होऊन नाशिक महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्रीफळ वाढवून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे, मनपा आयुक्त मनिषा खात्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सुनील बागुल, सुरेश पाटील, गणेश गिते, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, सुनील केदार, प्रथमेश गिते, सचिन बांडे, संदेश फुले, चंद्रकांत खोडे, भक्तीचरणदास महाराज डॉ. हेमलता पाटील, समीर शेटे आदी सहभागी झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group