नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या गोदापार्क या नवीन विद्युत उपकेंद्राला ३३ केव्ही वाहिनी जोडणीच्या कामाकरीता शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कॉलेजरोड व परिसरातील वीज पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
यामध्ये गंगापूर रोड, जेहान सर्कल, सहदेव नगर, डी के नगर, डिसूजा कॉलनी, चोपडा लॉन्स परिसर, जुना गंगापूर नाका, नेर्लेकर हॉस्पिटल परिसर, पाटील लेन १ ते ४, पाटील कॉलनी, डोंगरे वस्तीगृह सिग्नल परिसर आणि कॉलेज रोड हा भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. दिलेल्या वेळेपुर्वी काम पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल.
हे ही वाचा...
तसेच या दरम्यान शक्य झाल्यास पर्यायी उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व कृपया सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग - २ चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.