गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी डोके वर काढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अँक्शन मोडवर आले आहेत. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजता आयटीआय सिग्रलवरील ऑरा बारबाहेर काही तरुणांमध्ये झालेला वाद मिटविणाऱ्या बाऊन्सर्स’ला धक्काबुकी झाल्याने उदभवलेल्या ‘प्रोटेक्शन मनी’च्या वादातून गोळीबार झाला होता.

यात हल्ल्यात तिवारी नावाचा ग्राहक जखमी झाला होता. यानंतर जीवे ठार मारण्याच्या प्र्यत्नासह खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, भूषण प्रकाश लोंढे सह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभम पाटील , दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अंडागळे हे अटकेत असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
दरम्यान माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक ऊर्फ नानाजी यांना बुधवारी रात्री अटक केली होती. यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोंढे यांचा दुसरा पुत्र व सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे यांच्या शोधासाठी गुन्हेशाखेची चार स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.