नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीशी मंदिरात जाऊन लग्न करून तिच्याशी संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी मंगेश ज्ञानेश्वर चौधरी (वय 23, रा. तपोवन चाळ, टाकळी गल्ली, नाशिक) या मजूर काम करणार्या तरुणाने पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही एका मंदिरात जाऊन तिच्यासोबत लग्न केले. लग्न करून तिच्याशी या तरुणाने राहत्या घरी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले.
तरीही पीडित मुलीने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला; मात्र फिर्यादी यांनी आरोपी मंगेश चौधरी याच्याविरोधात सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे. हा गुन्हा प्रथम काशिमिरा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता; मात्र हा प्रकार नाशिक येथे तपोवनात घडल्याने हा गुन्हा आता आडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, मंगेश चौधरीविरुद्ध पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.