नाशिक : लॅमरोडच्या शाळेजवळ पहाटे बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक : लॅमरोडच्या शाळेजवळ पहाटे बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : शहरात वन्यप्राण्यांचे दर्शन वाढत चालल्याचे आणखी एक उदाहरण आज पहाटे दिसून आले. लॅमरोडवरील हॉटेल लोटसच्या मागील विद्या विकास मंदिर शाळेच्या आवारात आज  पहाटे पाच ते सहाच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झालेल्या परिसराच्या अगदी जवळ असलेल्या वडनेर भागातही मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी एकत्र येऊन वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून अनेक नागरिक भगूर येथे श्री रेणुका माता आणि नाशिक रोडवरील श्री दुर्गा मंदिरांमध्ये पहाटे व रात्री आरतीसाठी जातात. अशा वेळी बिबट्याचे दर्शन होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.

'या' लाडकीला बसणार धक्का ! सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

या पार्श्वभूमीवर आमदार सरोज हिरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. तसेच माजी नगरसेवक जगदीश पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले. यावेळी सोमनाथ कोठूळे,शहीद शेख आदी सह रहिवासी उपस्थित होते.वनविभागाने शक्य तितक्या लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group