पाच लाखाची लाच घेताना नाशिक मधील जीएसटी आणि सेंट्रल एक्साईज मधील अधीक्षक शर्माना सीबीआयने अटक केली आहे. पुणे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये असलेल्या कसबे वणी येथील उद्योजकावर कोणतीही कारवाई करू नये म्हणून नासिक येथील जीएसटी कार्यालयात असलेल्या अधीक्षकांनी त्या बदल्यात 50 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम देण्यास संबंधित उद्योजकाने नकार दिल्यानंतर चौधरी यांनी 22 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबतची कारवाई पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत पथकाला देण्यात आली होती.
या पथकाने केंद्रीय उत्पादन शुल्क आणि जीएसटी आयुक्तालयातील अधीक्षक शर्मा यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना 14 ऑक्टोबर रोजी रात्री अटक केली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या घरामध्ये एकूण 19 लाख रुपये आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडले असून कागदपत्रे या पथकाने जप्त केलेली आहे. त्यांना घेऊन पुणे येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.