गेल्या काही दिवसांपासून नासिक शहरात गुन्हेगारी डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांवर नाशिककर नाराजी व्यक्त करताना दिसत होते. दरम्यान आता नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी बघता नाशिक पोलीस आता ॲक्शन मोडवर आले आहेत.

पोलिसांनी आता भाजपचा माजी नगरसेवक मुकेश शहाणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही तासांपासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. शहाणेला कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ही चौकशी संध्याकाळपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती समजते आहे.
यापूर्वी पोलिसांनी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. तर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे अद्याप फरार असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
तर विसेमळा गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित अजय बागूल अद्याप पसार आहे.