शेतजमिनीचा कब्जा घेऊन दीपक लोंढे व सुकदेव बागूलने मागितली ९० लाखांची खंडणी
शेतजमिनीचा कब्जा घेऊन दीपक लोंढे व सुकदेव बागूलने मागितली ९० लाखांची खंडणी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेतजमिनीचा कब्जा घेऊन इसमाकडे 90 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी अजिंक्य विश्‍वासराव पाटील (वय 46, रा. गजरा हॉटेलजवळ, आडगाव) यांनी मयत हरी दशरथ बागूल (रा. मुरंबी, ता. इगतपुरी) यांच्याकडे गट क्रमांक 889 मधील 0.89 आर (89 गुंठे) जमीन रजिस्टर साठेखत करारनामा व विशेष मुखत्यारपत्र करून घेतली होती.

अजिंक्य पाटील यांच्या कब्जातील या शेतजमिनीवर आरोपी सुकदेव हरी बागूल (रा. मुरंबी, ता. इगतपुरी) व दीपक लोंढे (रा. सातपूर) यांनी अवैधरीत्या कब्जा केला होता. ही जमीन परत करण्यासाठी आरोपींनी पाटील यांच्याकडे 90 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी हे पैसे न दिल्याने आरोपींनी पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देत खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही शेतजमीन बळकावण्यासाठी आणि खंडणीची रक्कम मिळविण्यासाठी आरोपी सुकदेव बागूलने दीपक लोंढे याला सुपारी दिली होती.

ही घटना नोव्हेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान घडली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत. 
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group