नाशिकमध्ये शरणपूर भागात रात्री गोळीबार
नाशिकमध्ये शरणपूर भागात रात्री गोळीबार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असले तरी, शहरात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मध्यवर्ती भागातील तिबेटियन मार्केट लगत, संत अंद्रिय चर्च शेजारील बेथेलनगर वसाहतीत काल रात्री तब्बल चार ते पाच अज्ञातांनी दहशत माजवली.



मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास या अज्ञात टोळक्याने कोयते आणि बाटल्यांच्या सहाय्याने घराजवळ उभ्या असलेल्या रिक्षांची तोडफोड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यातील एका व्यक्तीने पिस्तूल काढून हवेत गोळीबार केल्याचेही समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेचा पंचनामा करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group